After Ajit Pawar rebellion affidavits will be taken from NCP workers and office bearers NCP Crisis  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP News : दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी सावध! कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून भरून घेणार प्रतिज्ञापत्र

रोहित कणसे

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. पक्षातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट देखील पक्षाकडून जागीर करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या महत्वाच्या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून पदाधिकारी कार्यकर्ते संघटनामध्ये प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची तयारी सुरू आहे.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा पक्ष उभारणीला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शरद पवार आज कराड दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी दिवंंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तसेच शरद पवार यांनी यांनी येत्या बुधवार, ५ जुलै रोजी, दुपारी १ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक देखील आयोजित केली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत शरद पवार उपस्थित कर्मचाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडून देखील ५ जुलै रोजीच सर्व समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५ तारखेला मेळावा घेण्याच्या तयारीत अजित पवार गट असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT