Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मिशन ठरलं! शिंदे गट लोकसभा-विधानसभेच्या 'या' जागांवर बजावणार हक्क

ठाकरेंच्या गैरहजेरीमध्ये शिवसेना कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने काल अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे.

या निवडीमुळे शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. आजच्या बैठकीत, शिंदे यांची निवड पक्षप्रमुखपदी होणार अशी चर्चा होती. मात्र शिंदे शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी कायम आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद घातली आहे. यापूर्वी महाराष्ट्र भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला होता. मात्र शाहांनी ४८ जागांचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला वरच्या फक्त तीन जागा मिळतील का?, असा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत शिंदे गटनेही आपल्या लोकसभा-विधानसभा जागांचं टार्गेट निश्चित केलं आहे. या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मिशनचीही घोषणा करत शिवसेना-भाजप युतीला लोकसभेत 45 आणि विधानसभेत 200 जागा जिंकण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव झाले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच वि.दा. सावरकर यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचा ठरावही घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT