Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनंतर अजित पवारांचा सोलापूर दौरा; घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर शहराचा दौरा केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर शहराचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारी (ता.१) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भाजप व राष्ट्रवादीतील या दोन दिग्गज नेत्यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटक निवडणूक निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दौरे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरत आहेत.(Latest Marathi News)

माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव डॉ. पृथ्वीराज माने यांच्या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ गुरुवारी (ता.१) सायंकाळी ६ वाजता जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी व एका खासगी कार्यक्रमानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीचा कोणताही राजकीय कार्यक्रम नसल्याची माहिती समोर येत आहे. तरी देखील अजित पवार यांना भेटण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

मे महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरचा मुक्कामी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर, सांगोला व सोलापूर शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावून जिल्ह्यातील राष्ट्रवादीत नवसंजीवनी भरली आहे.

त्यांच्या या दौऱ्यात सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत चाचपणी झाली. त्यानंतर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सोलापुरात मेळावा घेतला.

या मेळाव्यानंतर वातावरण काँग्रेसमय झाले होते. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूरचा दौरा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापुरात हजेरी लावून शासकीय कार्यक्रमांसह भाजपचा मेळावा घेतला. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सोलापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सोलापूरच्या राजकारणातील प्रमुख तीन पक्षांचे वरिष्ठ नेते सोलापुरात येऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीचा उत्साह संचारू लागला आहे.(Latest Marathi News)

भाजपने सुरू केली तयारी

माढा व लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने ग्राउंडवर जाऊन तयारी सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कामगारमंत्री खाडे यांनी कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन येथील अंदाज घेण्यास सुरवात केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी माढा मतदारसंघातील प्रमुख तालुक्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यांमुळे भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT