ShindeVsThackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

ShindeVsThackeray: पक्ष चिन्हं अन नाव मिळताच शिंदे गटानं ठोकला विधिमंडळावर दावा; अनिल देसाई म्हणतात...

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवले. पण न्यायालयाने उद्या येण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला "शिवसेना" आणि "धनुष्यबाण" हे चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे गटाचे वकिल सुप्रीम कोर्टात पोहचले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या येण्याचे निर्देश दिले.

यानंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च संस्थेकडून नीट विचार न करता विश्लेषण न करता निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. तर शिंदे गट शिवसेनेच्या वस्तूवर दावा करू शकत नाही. विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयावर कोणी दावा सांगू शकत नाही आम्ही अध्यक्षांकडे जाऊ आणि नियमानुसार प्रक्रिया पार पडेल असं ते म्हणाले आहेत. तर निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला असल्याचेही देसाई यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर कार्यालय ताब्यात घेण्यावर देसाई म्हणाले की, शिवसेना भवन किंवा कोणत्याही वास्तूवर ते दावा सांगू शकत नाहीत. निवडणूक आयोग चिन्हं आणि नावावर निर्णय देऊ शकतं. नाव आणि चिन्हं कोणाला द्यायचं याचा अधिकार आयोगाला आहे आणि त्यांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी ते गोठवू पाहत आहेत त्या चुकीच्या असल्याचं देसाई यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Iran War : अमेरिकेतील पराभवानंतर ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? इराणचा आक्रमक पवित्रा; इस्रायलवरून थेट निशाणा

विषारी हवेपासून बचावासाठी टॉप 5 बजेट Air Purifiers; किंमत 4,499 रुपयांपासून सुरु..पाहा फीचर्स आणि ऑफर्स!

IND vs NZ Test : भारताच्या पाच खेळाडूंची शेवटच्या दोन वन डे सामन्यांतून माघार; नेमकं कारण काय? मग त्यांच्या जागी कोण येणार?

Western Railway: पश्चिम रेल्वे सेवा ३ तासांपासून विस्कळीत! लोकल वाहतूक ठप्प, अनेक ट्रेन रद्द

कर्नाटक नंतर केरळमध्येही पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणाची तपासणी; चार जिल्ह्यांतील पंपावरील नमुने केले जमा

SCROLL FOR NEXT