Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : गुवाहटीच्या कामाख्या देवीनंतर आता शिंदे गटाचे अयोध्येच्या रामाला साकडे

एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार यांनी बंड केलं आणि महाराष्ट्रात गुवाहाटी प्रसिद्ध झालं

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार यांनी बंड केलं आणि महाराष्ट्रात गुवाहाटी प्रसिद्ध झालं. बंड केलेले आमदार हे गुवाहाटीला जाऊन राहिले होते. त्यानंतर पुन्हा राज्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि भाजपने एकत्रित येत सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 वेळा गुवाहाटीला गेले. तेथील देवीच्या दर्शनासाठीही गेले त्यांच्या या दौऱ्यावरून रणकंद दिसून आले. त्यानंतर आता यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदार आयोध्येला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनानंतर आता शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. अयोध्येला जाऊन शिंदे समर्थक प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली आहे. ठाण्यात शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी बोलताना शिंदे यांनी याबबात घोषणा केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार अयोध्येला कधी जाणार? याबाबत मुख्यमंत्र्यांनी काहीही स्पष्ट सांगितलं नाही.

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अयोध्या दौऱ्याला जाऊ शकतो. अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अयोध्या दौऱ्याला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्व आहे त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

त्याचबरोबर बोलताना ते म्हणाले की, आता आम्ही लवकरच अयोध्येला जाणार आहोत. आधीही रामाचं दर्शन घेतलं होतं. आता पुन्हा घेणार आहोत. वारंवार घेणार आहोत. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावं म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बनणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT