Ayodhya Paul Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर शाईफेक; घटनेनंतर पौळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'शंका...'

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महिलेवर शाईफेकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर काल ठाण्यात शाई फेक झाली. तसेच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात एका महिलेवर जाहीर कार्यक्रमात शाईफेक करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या शाईफेकीच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप देखील केले आहेत.(Latest Marathi News)

ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला या बोलावण्यात आलं होतं. मला जाणूनबुजून या कार्यक्रमाला बोलावलं होतं. कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. पण कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी थांबले अंसही त्या म्हणाल्या आहेत.

पुढे त्या मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आलं. मी महापुरुषांना हार घातले. त्यावेळी एक महिला तेथे आली आणि तिने मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या ऐकायला तयारच नव्हत्या. तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली. मला मारहाण करण्यात आली, असं अयोध्या पौळ म्हणाल्या आहेत.(Latest Marathi News)

या घटनेचा ठाकरे गटाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हंटलं कि, अयोध्या पौळ यांच्यावर झालेली शाईफेक आणि मारहाणाची घटना दुर्दैवी आहे. त्यांना षडयंत्र करून बोलावलं गेलं. अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रितसर पद्धतीने पोलीस चौकशी करतील याची आम्हाला खात्री आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई केली नाही तर आम्हाला काय करायचं ते बघू, असं केदार दिघे यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT