महाराष्ट्र बातम्या

Nanar Refinery : अपघात की घातपात? ज्याच्या विरोधात बातमी आली त्याच्याच गाडीने पत्रकाराला उडविले

घटनेची चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरीः सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. रत्नागिरीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी चौकशीची मागणी केली आहे. घटना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची आहे. काल राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. "मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो" अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात ही बातमी होती.

यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.

नातेवाईकांचा आरोप

वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रत्नागिरी येथील पत्रकारांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व पत्रकार आज सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेत आहेत. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या प्रकाराचाी चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT