Sambhaji Bhide Controversy Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide Controversy : भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट; वाशिममध्ये जाण्यासाठी बदलावा लागला मार्ग कारण....

वाशिममध्ये संभाजी भिडेंना मार्ग बदलून कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली त्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरात भिडेंविरोधात संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.

विधानसभेतही भिडेंच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. भिडे यांना अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. भिडेंचं हे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, राज्यात भिडेंच्या विरोधात संतापाची लाट उसळली असताना आजही शिवप्रतिष्ठानने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांच जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भिडे यांच्या या व्याख्यानाला विविध पक्ष आणि आणि संघटनांनी विरोध केला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरून जाणार त्या अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित बहुजन आघाडीसह इतर सामाजिक संघटनेने काळे रुमाल दाखवून निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे वाशिममध्ये तणाव निर्माण झाला आहे.

अशातच संभाजी भिडे यांना वाशिममध्ये मार्ग बदलून नेण्यात आलं आहे. कार्यक्रमाला होणारा विरोध लक्षात घेता त्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरून जाणार त्या अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित बहुजन आघाडीसह इतर सामाजिक संघटनेने काळे रुमाल दाखवून निषेध करण्यात येत आहे त्यामुळे मार्ग बदलून त्यांना नेण्यात आलं आहे.

व्याख्यानाच्या ठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त

काँग्रेससह इतर पक्ष भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे.शिवप्रतिष्ठाने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांच जाहीर व्याख्यान ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात ये-जा करणाऱ्या व्यक्तीची विचारपूसही करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT