Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बारामतीकरांना धक्का

जनतेचा आवाज ऐकून ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील

रुपेश नामदास

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बारामतीकरांना कमालीचा धक्का बसला. ‘पवारसाहेबांना कोणीतरी थांबवायला पाहिजे,’ अशी कार्यकर्त्यांची भावना होती.

आता नेमके काय करायचे, हे कार्यकर्त्यांना समजत नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते संयम बाळगून होते. विरोधी पक्षनेते अजित पवार हे याबाबत काय आदेश देतात, याची वाट शहरातील असंख्य कार्यकर्ते पाहत होते.

‘पवारसाहेबांची निवृत्ती इतक्या अचानक कशी होऊ शकेल?’ अशी चर्चा सुरू होती. अनेक कार्यकर्त्यांना या बातमीनंतर भावना अनावर झाल्या होत्या. अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमून या भूमिकेविषयी चर्चा करताना दिसत होते.

माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, देशातील शेतकरी, उद्योगपती, कामगारांसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला त्यांची गरज आहे. जनतेचा आवाज ऐकून ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील, असे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT