Sharad Pawar Nagaland esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "पदवीचं काय घेऊन बसलात ?" अदानीच्या पाठोपाठ मोदींच्या समर्थनार्थ पवारांची बॅटिंग!

8 दिवसात ३ मुद्यांवरुन शरद पवारांनी काँग्रससह आपला फटकारलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका पाहता मविआची वर्जमुठ सैल पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. अशा स्थितीत काँग्रेस, आम आदमी पार्टीसह विविध विरोधी पक्षांनी रणनीती म्हणून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शरद पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांवरच वेगळी भूमिका घेतली आहे.

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरूनही देशभरात राजकारण पेटलं. याची सुरूवात झाली ती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने ठोठावलेल्या २५ हजार रुपयांच्या दंडाच्या बातमीमुळे. माहितीच्या अधिकारात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती विचारली होती.

जी मिळाली नाही, त्यानंतर केजरीवाल माहिती आयुक्तांकडे गेले. त्यानंतर हे प्रकरण सुरतच्या कोर्टात गेलं. ज्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना दंड ठोठावला. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे. देशात बेरोजगारीचा प्रश्न असताना डिग्रीचं कसलं काय घेऊन बसलात? असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

“आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची डिग्री काय? हे जास्त महत्त्वाचं आहे का? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न समोर आहे. त्याबाबत या राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं मोदींचं नाव न घेता शरद पवारांचं सूचक वक्तव्य केलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डिग्री हा महत्त्वाचा प्रश्न नाही असं म्हटलं असताना संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीची मागणी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीत मतमतांतरं दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT