After the controversy arose, Chandrakant Patil bowed After the controversy arose, Chandrakant Patil bowed
महाराष्ट्र बातम्या

वादंग उठल्यानंतर चंद्रकांत पाटील नमले; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माझे सुप्रिया ताईंसोबत चांगले संबंध आहेत. आम्ही भेटतो व एकमेकांचा आदर करतो. नुकतेच एका कार्यक्रमात होते. माध्यमांमध्ये गैरसमज सुरू आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (After the controversy arose, Chandrakant Patil bowed)

कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलले होते. त्यांच्या वक्तव्याने महिलेचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधताना भाजपला महिला विरोधी म्हटले आहे. महाराष्ट्रात ओबीसी (इतर मागासवर्गीय) नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाबाबत दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. याच अनुषंगाने भाजप नेत्याने वरील भाष्य केले आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या लढ्याची तुलना मध्य प्रदेशशी केली. त्यावर भाजप नेते प्रतिक्रिया देत होते.

ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले

ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भाषेवरून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. हा सर्व महिलांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल केंद्र सरकारला सुप्रिया सुळे यांनी विचारला होता. यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT