Milk Agitation 
महाराष्ट्र बातम्या

'बा विठ्ठला... मुक्‍या-बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे !' 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : "राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे मुके, बहिरे व आंधळे आहे. अशा सरकारला बा विठ्ठला, सु बुद्धी दे', असे साकडे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विठ्ठलाला घातले. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा, सरकारने प्रतिलिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले आहे. आज सकाळी सदाभाऊ खोत यांनी संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून सरकार विरोधात आंदोलन केले. या वेळी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

श्री. खोत म्हणाले, राज्यातील सुमारे 46 लाख शेतकरी आज सरकार विरोधातील दूध आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान दिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अनुदान बंद केले आहे. शिवाय दूध दरात कपात केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही एक देणे-घेणे नाही. स्वतःचे खासगी दूध संघ पोसण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीकाही श्री. खोत यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकसंघपणा नाही. एक मुका, दुसरा बहिरा तर तिसरा आंधळा आहे. अशा या सरकारला सर्वसामान्य जनतेचा आक्रोश ऐकायला येत नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री खोत यांनी दिला. 

तत्पूर्वी पहाटे माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनीही आज पंढरपुरात येऊन चंद्रभागेला दुग्धाभिषेक केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव दिला होता. दूध पावडर निर्यात अनुदान दिले होते. परंतु या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका महादेव जानकर यांनी केली. 

या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, स्वप्नील भोसले, सूरज भोसले आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

SCROLL FOR NEXT