Agriculture
Agriculture 
महाराष्ट्र

कृषी पर्यटनाकडे वाढतोय कल

सकाळवृत्तसेवा

राज्यातील उलाढाल २० कोटी; कृषी पर्यटन केंद्रांमध्ये वृद्धी
पुणे - सकाळी कोंबड्याची बांग, गोठ्यात गुरांचे हंबरणे, पक्ष्यांच्या किलबिलाटात डोंगरामागून उगवलेला सूर्य, घरातील चूल, कोवळ्या उन्हात चमकणारे शेत ही ग्रामीण श्रीमंती आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा ओढा कृषी पर्यटनाकडे वाढला असून, ही उलाढाल २० कोटींच्याही पुढे गेली आहे.

देश-विदेशातील पर्यटनाबरोबर ग्रामीण भाग आणि ग्रामीण संस्कृती समजून घेण्यासाठी पुणेकरांची कृषी पर्यटनास चांगलीच पसंती मिळत आहे. कृषी पर्यटनामध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहे. पुणे शहराच्या आसपासच्या भागात  ७२ कृषी पर्यटन केंद्र आहेत. या केंद्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये पुणेकरांची संख्या अधिक आहे. शहरातील पर्यटक सहकुटुंब या केंद्रांना भेट देतात आणि ग्रामीण संस्कृती जाणून घेतात. मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने पर्यटक केंद्रात येत असल्याचे केंद्र चालक सांगतात. केंद्रामध्ये पारंपरिक खेळ, बैलगाडी सफर, ट्रॅक्‍टर सफर, शेतीविषयी माहिती, प्राण्यांची माहिती, प्रत्यक्ष शेतीचा अनुभव, पोहण्यास शेततळे अशा सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. उन्हाळा आणि शाळांच्या परीक्षा यामुळे मार्च, एप्रिल महिन्यामध्ये कृषी पर्यटनाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षांपासून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यभरात कृषी पर्यटन केंद्राची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पर्यटकांसाठी कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.
- बाळासाहेब बराटे, अध्यक्ष, राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ

शहरातील नागरिकांना विशेषतः मुलांना आपली ग्रामीण संस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी पर्यटक कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. गेल्या काही वर्षांमध्ये कृषी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे.
- शशिकांत जाधव, कृषी पर्यटन केंद्राचे मालक 

आपण शहरांना कंटाळलेलो असतो. त्यामुळे शहराच्या गोंगाटातून मनाला शांती मिळावी, मातीचा गंध मिळावा, मातीशी असलेली नाळ तुटू नये, असे वाटते. यासाठी कृषी पर्यटन चांगला पर्याय ठरत आहे. तेथे ग्रामीण संस्कृती अनुभवता येते.
- दीपक बिडकर, पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT