Ahilyabai Holkar Jayanti 
महाराष्ट्र बातम्या

Ahilyabai Holkar Jayanti: रोहित पवारांकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी; राजकारण तापलं

विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यासंदर्भात काही माहिती नसल्याचे म्हटले आहे

धनश्री ओतारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी देखील राजकारण चांगलेच तापले आहे. सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यासंदर्भात काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. (Ahilyabai Holkar Jayanti Rohit Pawar Midnight celebrate maharashtra politics )

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज (बुधवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आज होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.

मात्र, रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीत पूजा करुन मिरवणूक काढली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यासर्वाची माहिती रोहित पवार यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केली आहे.

गेल्या वर्षी जयंती कार्यक्रमात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हाही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकारण समोर आले होते. यंदाही यावरुन राजकारण रंगले आहे. कारण बुधवारी सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT