कृष्णूर धान्य घोटाळा 
महाराष्ट्र बातम्या

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी अजय बाहेती 'ईडी'च्या कोठडीत

कृष्णूर (ता. नायगाव) येथे अजय बाहेती याच्या मालकीची इंडिया मेगा अॅग्रो कंपनी आहे. या कंपनीत शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यावर प्रकिया करण्याचे काम चालत होते.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या कृष्णूर (ता. नायगाव ) येथील धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी अजय बाहेती याला नागपूर ईडीकडून गुरुवारी (ता. २४) अटक केली. त्याला न्यायालयाने शुक्रवारी (ता. १५) आठ दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. अजय बाहेती याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांचा औरंगाबाद खडपीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्थी टाकून नुकतीच जामिनावर सुटका केली होती.

कृष्णूर (ता. नायगाव) येथे अजय बाहेती याच्या मालकीची इंडिया मेगा अॅग्रो कंपनी आहे. या कंपनीत शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यावर प्रकिया करण्याचे काम चालत होते. मात्र अजय बाहेती याने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाला व धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला हाताशी धरुन गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावून घेत स्वस्त धान्य थेट आपल्या कंपनीत उतरवित असे. तत्कालीन पोलिस अधीक्षक व सध्या अमरावती रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी तीन वर्षापूर्वी या कंपनीवर कारवाई केली होती.

हेही वाचा - नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीवरुन राजकारण नको; विकासावर व्हावी चर्चा

कारवाईनंतर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात जाणारे धान्य भरलेले ट्रक या कंपनीत पोलिसांनी जप्त केले होते. जवळपास ११ ट्रक जप्त करुन ट्रकचालकासह मुखय आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक प्रकाश तापडिया, पुरवठा कंत्राटदार राजू पारसेवार आणि हिंगोलीचा ललीत खुराणा याच्यासह १९ जणांवर कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक व सध्या नागपूर पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांनी योग्य तपास करुन आरोपींना अटक केली. दरम्यानच्या काळात हा तपास राज्य गुन्हे विभागाकडे वर्ग झाला. सीआयडीने या प्रकरणात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

यातील अजय बाहेती याच्यासह या गुन्ह्यात अडकलेले आरोपी हे जवळपास एक वर्ष हर्सुलच्या कारागृहात शासकिय पाहूणचार घेत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय औरंगाबादने काही अटी व शर्थी आणि कोट्यावधी रुपयाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामिन दिला होता. पुन्हा बंद पडलेली कंपनी सुरु करण्यात आली. मागील काही दिवसात पुन्हा ही कंपनी चर्चेत आली. काही कामगारांनी व संघटनांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन केले होते.

येथे क्लिक करा - कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.

मात्र या धान्य घोटाळा प्रकरणात सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उडी घेतली आहे. ईडीने एक नोटीस पाठवून नागपूर येथे अजय बाहेती याला गुरुवारी बोलावून घेतले. त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्याला ईडीने अटक केली. शुक्रवारी (ता. २५) जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात लवकरच आजय बाहेती याचे सहकारी व्यवस्थापक प्रकाश कापडिया वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खुराना यांच्यासह अनेकांची ईडीकडून तपासणी होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT