Manoj Jarange_Ajay Barskar 
महाराष्ट्र बातम्या

Ajay Barskar: "जरांगेंनी तुकोबांची मागितलेली माफी अहंकारमिश्रीत"; बारस्करांची पुन्हा कडवी टीका

जरांगेंवर मी नव्हे तर त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोप करण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : हभप अजय बारस्कर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जरांगेंनी संत तुकाराम महाराजांची मागितलेली माफी ही अहंकार मिश्रीत होती, अशा शब्दांत सडकून टीका केली आहे. जरांगेंवर मी नव्हे तर त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोप करण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी केला. (ajay barskar says manoj jarange apology to sant tukaram was arrogant)

पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर म्हणाले, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जरांगेंकडं नसल्यानं त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. माझी ३०० कोटींची संपत्ती आहे तर मी ४० लाख रुपये का घेऊ? असा सवाल त्यांनी केला. तसेच जरांगेंनी माझ्याविरोधात केलेला विनयभंगाचा आरोपही खोटा असून जरांगे आता बेछूट आणि बेताल झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुराव्यांशिवाय जरांगे माझ्यावर आरोप करत आहेत. लोणावळ्यातील सभेवेळी सरकारी अधिकाऱ्यांशी बंद दरवाजाआड काय डील झाली? असा सवाल पुन्हा एकदा त्यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

देहू संस्थानला केली विनंती

बारस्कर म्हणाले, "तुकाराम महाराजांना जरांगे 'संत फंत' असा शब्द वापरला हे देहू संस्थान सहनच कसं करतात. देहू संस्थानशी माझा काही संबंध नाही. कारण तुकाराम मराजांचे जे वंशज आहेत मोरे तेच शिळा मंदिराचे ट्रस्टी आहेत. पण माझी त्यांना विनंती आहे की, तुकोबारायांचे अभंग तिथं बदलले गेलेत त्यावर आपण भाष्य करायला पाहिजे ना?" (Marathi Tajya Batmya)

जरांगेंच्या आरोपांना दिलं थेट आव्हान

बारस्करांनी जरांगेंना आव्हान देताना म्हटलं की, "जरांगेंनी माझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप केला. तर मग त्या पीडित महिला त्यांनी समोर आणाव्यात. त्याचबरोबर मी प्रश्न आरक्षणाबाबत विचारले पण जरागेंनी त्याची उत्तर दिली नाहीत. मागच्या १७ दिवसांचं आंदोलन सुरु होतं तेव्हा जरांगे कोणाच्या घरात बसून दुध भाकरी खात होते. कोणाकडून पाय दाबून घेतले याचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर कोणत्या महिलेला अंबडचा आमदार बनवण्याचं आश्वासन दिलं, हे मला माहिती आहे. पण आमची संस्कृती ती नाही. रातोरात जरांगेंकड मोठा पैसा आला याविरोधात मी इन्कम टॅक्स आणि ईडीकडं जाणार आहे, असंही बारस्कर यावेळी म्हणाले."

सर्व चौकशांना तयार

माझ्यावर जे आरोप झाले त्यावर चौकशीसाठी मी तयार आहे. नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टसाठी देखील मी तयार आहे, असंही बारस्कर यांनी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी ११ वाजता दुसरे लोक पत्रकार परिषद घेऊन जरांगेंबद्दल माहिती देतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT