Aurangabad Crime News sakal
महाराष्ट्र बातम्या

ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्तेंचा सहकारी अजय गुजरला अटक

गुजर याला औरंगाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : एसटी संघटनेचा अध्यक्ष असलेल्या कर्मचारी अजय गुजर याला पोलिसांनी आज शुक्रवारी (ता.१५) औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. गुजर हा अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांचा सहकारी आहे. ही कारवाई अकोल्यातील अकोट पोलिसांनी केली आहे. अजय गुजर हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. एसटी कामगार (ST Worker) संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट पोलीस ठाण्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून ७४ हजार ४०० रुपये निधी संकलित करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान आज शुक्रवारी या प्रकरणी आरोपी अजय गुजर याला औरंगाबाद (Aurangabad) येथून अकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Kesari : कुंडलचे मैदाना हिंदकेसरी गोलियाने मारले, ४ महाराष्ट्र केसरी पराभूत; महिला कुस्तीतही उत्तर भारतियांचा डंका

Aurangabad Crime: ‘इन्स्टाग्रामवर फेमस होण्यासाठी व्हिडिओ का टाकतेस?’; छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयावर चाकूने हल्ला

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

SCROLL FOR NEXT