Uddhav Thackeray vs Ajay Kumar Mishra esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल

शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं आहे.

शिवसेनेत (Shiv Sena) आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून सत्ता स्थापन केली. या सत्तांतरासोबतच राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल पहायला मिळत आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट हा आपण असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडं ठाकरेंकडून त्याला विरोध होत आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता सुप्रीम कोर्ट आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दारात आहे. दरम्यान, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत आज भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे दोन मंत्री दाखल झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मिश्रा यांनी हल्लाबोल केलाय.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे, असं मिश्रांनी म्हटलंय. यावेळी केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या घरी भेट देत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपकडून कधीच सरकारी यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपवर आरोप करत आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचंही मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT