Ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: ''राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी तमाम जनतेची माफी मागतो'', मालवण घटनेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

अहमदपूर शहरात जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळणे ही सर्वांना धक्का देणारी बाब आहे. या घटनेस जे जबाबदार आहेत, ते वरिष्ठ अधिकारी असो किंवा कोणीही असू दे त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’’ असे आश्‍वासन त्यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूरः ‘‘मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळवाऱ्यामुळे कोसळला. यासंदर्भात जे कोणी जबाबदार असतील, त्यांची चौकशी होईल. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी या घटनेबद्दल तमाम जनतेची माफी मागतो,’’ असे अजित पवार यांनी बुधवारी नमूद केले.

अहमदपूर शहरात जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळणे ही सर्वांना धक्का देणारी बाब आहे. या घटनेस जे जबाबदार आहेत, ते वरिष्ठ अधिकारी असो किंवा कोणीही असू दे त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’’ असे आश्‍वासन त्यांनी दिले.

संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली. महापुरुषांच्या स्मारकांची कामे चांगलीच झाली पाहिजे ही प्रत्येकाची धारणा असते. महापुरुषांविषयी प्रत्येकांत आदराची भावना आहे. त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करावा तेही थोडे आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईसाठी आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता या मुद्द्याला राजकीय रंग चढू लागला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या निषेध मोर्चाच्या निमित्ताने राणे आणि ठाकरे गटांत जोरदार राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे येथे निषेध मोर्चासाठी आले होते तर त्याचवेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे हे शेकडो कार्यकर्त्यांसह दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येथे आल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

दोन्ही गटांतील कार्यकर्ते परस्परांना भिडल्याने शहरातच तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेक झाली तसेच पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. अखेर पोलिसांनी दोरखंडाचा वापर करत एका गटाला राजकोटपासून दूर केल्याने या वादावर पडदा पडला. या राड्यादरम्यान कार्यकर्त्यांनी दगड, चप्पल आणि लाकूडही फेकून मारल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते जखमी झाले होते. किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने जनसंताप निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यासाठी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचेप्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी खासदार विनायक राऊत आले होते.

तटबंदीचे दगड कोसळले

या राड्यादरम्यान राजकोट किल्ल्यातील मधल्या भागातील तटबंदीचे अनेक दगड कोसळले. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह काही महिलाही जखमी झाल्या. पोलिस दोन्ही गटांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रोखत होते यात काही कार्यकर्त्यांना, महिलांनाही मारहाण झाली. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. दोन्ही गटांतील प्रमुख पदाधिकारी एकमेकांना आव्हान देत होते.

जयंत पाटील यांची मध्यस्थी

दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलिस यंत्रणेला न जुमानता एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. परिस्थिती अधिकच गंभीर बनली. भाजप नेते नीलेश राणे यांनी पोलिसांना धारेवर धरले. स्वतः नारायण राणेही संतप्त झाले. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेत ही परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही दोन्ही गट आक्रमकच होते.

१ सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन

पुतळा प्रकरणावरून महाविकास आघाडी सत्ताधारी महायुती सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान अवमान करणाऱ्या युती सरकार विरोधात महाविकास आघाडीने १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन पुकारले आहे. सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT