महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''ते स्वतःला 'यूएनआय'चे अध्यक्षही लिहू शकतात'' शरद पवारांचा अजित पवारांना चिमटा

सकाळ वृत्तसेवा

अकोलाः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यामध्ये राजकीय कलह निर्माण झाला आहे. दोन्ही गट आमचाच पक्ष खरा, असं म्हणत आहेत. पक्षाचा वाद निवडणूक आयोगात, सुप्रीम कोर्टात आणि विधानसभा अध्यक्षांकडे सुरु आहे.

शरद पवार हे अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. दी. जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील एक शाळा द्राक्षापासून मद्य तयार करणाऱ्या एका कंपनीला चालविण्यासाठी दिली. या कंपनीने शाळेत नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावर पवार यांनी टीका करताना, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे काय होईल, याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. शैक्षणिक संस्थांचे पावित्र्य अबाधित ठेवा, अशी विनंतही पवार यांनी केली.

आगामी निवडणुकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील ७० टक्के राज्यात भाजपची सत्ता नाही. त्याचा परिणाम काय होईल, हे पुढे दिसून येईलच. इंडिया आघाडीला पंतप्रधान पदासाठी चेहरा देण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर काय ते ठरविले जाईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, ते स्वतःला संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्षही लिहू शकतात. मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील हे माझ्या सोबत आहे, असे सांगून त्यांनी आमची भूमिक स्पष्ट असल्याचे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते इंडिया आघाडीत असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाचा निर्णय हा आघाडीतील नेत्यांना एकत्रित बसून घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, त्यामुळे त्यांचा आघाडीतील प्रवेशाचा निर्णय होऊ शकला नाही. तो निर्णय घेण्याचा अधिकार मला एकट्याला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

भाईसाब...! इंडिगोची उड्डाणं 'या' पनौती तरुणामुळे रद्द झाली, समय रैनासोबतचा Viral Video

उंच इमारत, १०२० खाटा, अत्याधुनिक सुविधा... मुंबईतील 'हे' मोठे रुग्णालय आधुनिक सुपर-स्पेशालिटी केंद्र बनणार, वाचा ५७३ कोटींचा मेगा प्रकल्प

Latest Marathi News Live Update : आई वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव, मृतदेह नदीच्या पुलाखाली टाकला

Viral Video : ग्रँड व्हिटारा अन् नेक्सॉनची समोरासमोर धडक; 5 स्टार कारमधील फॅमिलीचं काय झालं? चेपलेल्या गाड्यांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT