Navneet Rana Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"आज अजित पवार मुख्यमंत्री असते तर..."; नवनीत राणांचं मोठं विधान

मुख्यमंत्री घाबरले म्हणून त्यांनी पोलिसांचा आधार घेतला, असं विधानही नवनीत राणा यांनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातलं वातावरण कालपासून चांगलंच तापलेलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या निर्णय़ावरून शिवसैनिक चांगलेच संतापले होते. दोन दिवस चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज अखेर राणा दाम्पत्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री असते तर परिस्थिती इतकी खराब झाली नसती, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "राज्यात कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवत असेल तर ते उद्धव ठाकरे बिघडवत आहेत. ज्या पद्धतीने डेप्युटी सीएम अजितदादा...आदरणीय अजितदादा बोलले की त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की मुख्यमंत्री या सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. मला वाटतं कारण मुख्यमंत्र्यांना दुसरं काही कामच उरलेलं नाही".

त्या पुढे म्हणाल्या, "नवनीत राणाला, रवी राणाला कधी माझे गेलेले गुंड मारतायत याच्याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. रवी राणा, नवनीत राणा सुरक्षित राहिले पाहिजेत, लोकप्रतिनिधीवर काही धब्बा नाही लागला पाहिजे याच्यावर त्यांचं लक्ष नाहीये. याच ठिकाणी जर अजित पवार मुख्यमंत्री असते तर या महाराष्ट्रात परिस्थिती इतकी खराब कधीच झाली नसती. दुसरा आरोप गृहमंत्र्यांवर आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT