Ajit Pawar is still corona positive
Ajit Pawar is still corona positive Ajit Pawar is still corona positive
महाराष्ट्र

अजित पवार अजूनही कोरोना पॉझिटिव्ह; बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह (corona positive) आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप सुरू असताना अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावेळी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे अजित पवार यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांना तीन व चार तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय गोंधळ सुरू असताना अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अजित पवार यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी (corona positive) करून घ्यावी’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

आता महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. नवीन सरकार स्थापनही झाले आहे. सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या बहुमत चाचणीला अजित पवार उपस्थित राहणार आहे. बहुमत चाचणीच्या वेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT