Ajit Pawar vs Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

'भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाहीय.'

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल पुन्हा एकदा हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासाठी खास काही वेगळे संदर्भ आणले आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. तसेच शरद पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं, असा टोला लगावला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना नास्तिक म्हटल्यानं त्यांना बोचलं असं म्हणत सुप्रिया सुळेंचा संदर्भ दिला. ते काल रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते. या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नाशिकमधील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी काल पूर्वीचंच भाषण रिपीट केलंय. भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाहीय. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळं घरी बसून आणि सभेत बोलायला काय जातं? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशारा अजित पवारांनी राज यांना दिलाय.

ते पुढं म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम महात्मा फुलेंनी केलंय, त्यामुळं इतिहास नीट अभ्यासला जावा, असा सल्लाही त्यांनी राज यांना दिलाय. राज यांनी उन्हाचा तडाखा, भारनियमन, महागाई, कोळशाचा तुटवडा या प्रश्नांबद्दल बोलावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

शरद पवारांना काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार सांगतात आम्ही दोन समाजात दुही माजवत आहोत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत, त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायची. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग, त्यांचे मंदिरांमधील फोटो यायला लागले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Politics: जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप! उमर अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात? नॅशनल कॉन्फरन्समध्ये काय घडतय

Sanjay Gupta Passed Away: शूटआउट अ‍ॅट वडाळा फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचं निधन, वयाच्या ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

Geetanjali Chavan Success Story : सिंधुदुर्गची कन्या चमकली! वडिलांचं छत्र हरपलं, पण जिद्द नाही सोडली; गीतांजलीची सुरक्षा दलात निवड, वाचा प्रेरणादायी कहाणी

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

SCROLL FOR NEXT