विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज विविध विकास कामांची पाहणी केली तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पवार यांचा ढोल ताशा वाजवत सत्कार केला. दरम्यान संध्याकाळी पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी चौरफेर टीका केली.
तर काहींची कान उघडनी देखील केली. ज्या कार्यकर्त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन होते त्याचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. ज्यामध्ये तो अधिकाऱ्यांना धमकी देण्यात होता. अजित पवार म्हणाले की, "नेमकं मला हेच आवडत नाही, अधिकाऱ्यांना मानसन्मान दिला पाहिजे.
मी पण तापट अन् कडक आहे, मी कोणावरही उगाच चिडत नाही कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर चिडतो, अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जातो, त्यांना कोट्यवधी रुपये पगार देतो. हा आकडा वाढत आहेत, दीड लाख कोटी नुसते पगारावर जात असतील तर अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, काही ही झालं तरी सरकारी पगार रखडत नाहीत.
बाकीच्याचं तसं नाही शेतकरी, कामगार, दुकानदार यांचं वेगळं आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कामाची अपेक्षा असते. तर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले "आता योगी महाराज आले आहेत महाराष्ट्रात. ते तिकडून येऊन आपल्या उद्योगवर डल्ला मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करत आहेत".
काल योगी मुंबई दौऱ्यावर आले होते त्यांनी उद्योगपतींची आणि काही अभिनेत्यांशी चर्चा केली. तर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला प्रसाद लाड आणि गोपीचंद पडळकरांवर टिका करताना ते म्हणाले की, "एक तर पठ्ठ्या म्हटला शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. अन् दुसरा म्हटला की शिवाजी महाराजांचा कोथळा काढला.
त्यानंतर त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली ते म्हणाले "आपले पालकमंत्री म्हणत होते की भीक मागीतली, महात्मा फुले त्या काळात सक्षम होते आणि तुम्ही म्हणता भीक मागत होते आम्हाला राग नाही येणार" असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर चौफेर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.