Ajit Pawar Latest Marathi News Ajit Pawar Latest Marathi News
महाराष्ट्र बातम्या

तुमची सत्ताही कधीतरी जाणारच; मग...; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिंदे गट व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होताच जुन्या सरकारच्या योजना बंद केल्या जातील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काहीही करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) काही कामांना स्थगिती देण्यात आली. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही शपथ घेतल्यापासून मागील सरकारच्या कोणत्याही योजना किंवा कामांना सरसकट बंद करणार नाही तसेच स्थगिती देणार नाही, असे सांगत आहे. जिथे काही चूक झाल्याचे लक्षात येईल त्यावर मात्र बंदी आणण्यात येईल, असे सांगितले. यामुळेच काही कामांना विद्यमान सरकारकडून बंद करण्यात आले.

सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे. एकनाथ शिंदे यांनी मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मागील सरकारच्या योजना बंद करणे योग्य नाही. अस करण्याचे काहीच कारण नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

कुणाच्या घरची कामे नव्हती

सरकार येते आणि जाते. २०२१ पर्यंतची कामे बंद करणे योग्य नाही. ती विकासाची कामे होती. महाराष्ट्राची कामे होती. कुणाच्या घरची कामे नव्हती. अशा खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. हे तातडीने थांबवायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.

जास्त निधीचे केले वाटप

महाविकास आघाडीने शेवटच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठका घेत अनेक निर्णय मार्गी लावले. शेवटच्या काळात त्यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. निधी नसताना जास्त निधीचे वाटप केले होते. हे योग्य नाही. यावर निर्बंध तर आडनावचं लागले, असे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT