Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार गटाची विदर्भातील 10 पैकी 3 जागांवर नजर; भाजप खासदार असलेल्या 'या' जागांवर सांगितला दावा

आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे

रोहित कणसे

नागपूर : आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा सुत्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीये. यादरम्यान विदर्भातील तीन जागांवर दावा करण्यात आला आहे.

शरद पवारं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विदर्भातील 10 पैकी 3 जागेवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया, गडचिरोली तसेच वर्धा जिल्हा या तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत.

यात भाजपचे विद्यामान खासदार असलेल्या अशोक नेते यांचा जागेवर देखील अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा यांनी स्वतः इच्छुक असल्याच सांगतीले आहे. तसेच बरोबर भंडारा-गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत, पण याठिकाणी सुद्धा दावा करण्यात आला असून प्रफुल पटेल यांच्यासाठी ही जागा मागण्याची अजित पवार गटाची तयारी आहे.

तसेच वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत. असे असताना देखील या ठिकाणी या जागेची देखील अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे.. त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वतः तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदार संघातील अनेक लोकांचा ते संपर्कात आहेत. त्यामुळे आता या तीन जागांवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT