Ajit Pawar, Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: पहाटेच्या शपथविधीच्या आत्मचरित्रातील उल्लेखावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले 'मी...'

शरद पवारांच्या आत्मचरित्रात पहाटेच्या शपथविधीवर भाष्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार यांनी भाजपसोबत जात पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? त्यानंतर अजित अजित पवार यांचं बंड कसं थोपवलं याचा सविस्तर उल्लेख शरद पवार यांचं आत्मचरित्र लोक माझे सांगाती' मध्ये करण्यात आला आहे. अजित पवार यांना याबाबत विचारलं असता मी पुस्तक वाचलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणं टाळलं आहे. अजित पवार यांनी म्हटलं की, लोक माझे सांगाती पुस्तक मी अद्याप वाचलेलं नाही. त्यामुळे मला याबाबत काहीच माहित नाही. मी पुस्तक वाचून याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत अजित पवार?

मी अजून पुस्तक वाचलेलं नाही. मला काही चर्चा माहीती नाही. कालपर्यंत मी बाहेरच होतो. आलो तसाच सभेला गेलो. सभेवरून रात्री उशीरा आलो. मला पहिल्यांदा पुस्तक वाचू देत मी पुस्तक वाचलं की मी बोलेन. मला काही माहीत नसताना मी प्रतिक्रिया दिली की त्याच्या वेगळ्या बातम्या येतात. त्यामुळे मी आधी पुस्तक वाचतो. त्यानंतर प्रतिक्रीया देतो असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

पहाटेच्या शपथविधीमागे खरंच हात होता? पुस्तकात शरद पवारांचा मोठा खुलासा

या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात आहे, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अप्रत्यक्षरित्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे चर्चेला उधाण आलं. शरद पवार यांनी मात्र याबाबत कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता त्यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला आहे. अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी समजल्यावर धक्का बसल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती पुस्तकाच्या दुसऱ्या भागात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT