Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र

...अन् अजित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं; म्हणाले, फुकट कामं करता का? | Video Viral

दत्ता लवांडे

मुंबई : सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत पार पडत आहे. अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून मागचे चारही दिवस वादळी ठरले आहेत. दरम्यान आज सभागृहात विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या काटेकोर स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. चूक झालेल्या एका अधिकाऱ्याला अजित पवारांनी चांगलंच झापलं असून थेट निलंबन करण्याची मागणी केली आहे.

(Opposition Leader Ajit Pawar In Monsoon Session)

दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवार सभागृहात बोलत असताना त्यांना दिलेल्या एका निवेदनातील कागदपत्रांमध्ये विधानसभा ऐवजी विधानपरिषद असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर अशी निष्काळजी करणाऱ्याला अजित पवारांनी चांगलंच झापलं आहे. "आपण विधानसभेत आहोत, ही विधानपरिषद नाही याचं भान ठेवा. ज्या कुणाकडून ही चूक झाली आहे त्याला सरकार सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देतंय, तुम्ही फुकट कामं नाही करत. ज्यांच्याकडून ही चूक झाली आहे त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लावा, परत असं होता कामा नये, नाहीतर त्यांना निलंबित करा." अशा शब्दांत अजित पवारांनी सुनावले आहे.

याप्रकरणानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी संबंधित चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान अजित पवारांचा रागीट पण तेवढ्याच शिस्तप्रिय स्वभावाचे दर्शन आज पुन्हा झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT