Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यामागं नाराजीचं कारण होतं का? अजित पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं

राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक काल पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक काल पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते. अजित पवार नाराज असल्यानं या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेले असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेवर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझ्या नियोजित कार्यक्रम होता. तर कालच सकाळी १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. पण काही कारणांमुळं ही बैठक उशीरा सुरु झाली. पण माझ्या हेलिकॉप्टरला दुपारी १ वाजता टेकऑफ करायचं होतं. त्यामुळं कॅबिनेट उशीरा सुरु झाल्यानं साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत मी तिथं थांबलो.

१ वाजता मला जाणं गरजेचं होतं. कारण २ वाजेपर्यंत मला नांदेडला पोहोचून तिथून पुन्हा हेलिकॉप्टरनं अहमदपूरला जायचं होतं. तिथं अत्यंत साधेपणानं एक शेतकरी मेळावा मी केला. यावेळी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आलो, अशी खरी वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

SCROLL FOR NEXT