Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवारांनी केला गौप्यस्फोट; म्हणाले...

अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरच्यांची भेट घेतली

रुपेश नामदास

भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जावून घरच्यांची सांत्वनपर भेट घेतली. अजित पवार यांनी मुलांची आणि जगताप यांच्या भावांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला.

जगताप हे राष्ट्रवादीचे तसेच अजित पवार यांचे खंदे मानले जात होते. पक्षाच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप यांना अनेक मोठी पदं दिली. यावेळी अजित पवार यांनी २००४ सालच्या विधान परिषद निवडणुकीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले कि "२००४ च्या निवडणुकीवेळी चिंचवडची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती.

मात्र या परिसरात राष्ट्रवादीच्या विचाराची मतं मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे मला त्या ठिकाणाहून आमच्या विचाराच माणूस निवडून आणायचा होता. म्हणून मी त्याला सांगितलं उमेदवारी अर्ज भर आणि मी सांगेपर्यंत मोबाइल स्विच ऑन करू नको.

माला खात्री होती निवडणुक झाली तर निश्चित लक्ष्मणला तिथून निवडुन आणेल आणि निवडणुक झाली आणि लक्ष्मण एकतर्फी निवडून आला." असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT