ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : प्रतिज्ञापत्रच घेतलं! अजित पवारांकडे 44 आमदारांचं संख्याबळ?, थोड्याच वेळात सोक्षमोक्ष

Maharashtra Politics Update : अजित पवार यांच्याकडे ४४ आमदारांचं संख्याबळ असल्याचं सांगण्यात येत आहे. 'टीव्ही ९'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर शरद पवार यांच्याकडे केवळ ११ आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगण्यात येतेय.

संतोष कानडे

Mumbai Political News : अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून आज बैठक बोलावण्यात आलेली असून कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.

अजित पवार यांच्याकडे ४४ आमदारांचं संख्याबळ असल्याचं सांगण्यात येत आहे. 'टीव्ही ९'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर शरद पवार यांच्याकडे केवळ ११ आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगण्यात येतेय. अजित पवारांकडे विधानसभेचे ४२ आणि विधान परिषदेचे २ आमदार असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलेलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाने ४४ आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं असून त्यांना आजच्या बैठकीसाठी व्हिप लागू होणार आहे. आज मुंबईतल्या एमईटी कॉलेजमध्ये अजित पवार गटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमके किती आमदार उपस्थित राहतात, हे काही वेळात कळेलच.

दुसरीकडे शरद पवार गटाकडे ११ आमदार असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात वाय.बी. सेंटरमध्ये किती आमदार हजर राहतात, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी ५३ आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानुसार अजित पवार गटाकडे केवळ ९ आमदार आहेत. खरी परिस्थिती काही वेळात समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT