Ajit Pawar News 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांनी तातडीने थांबवला आपला ताफा, अपघातातील जखमीला केली मदत

अजितदादांनी तातडीने आपल्या ताफ्यातील कार दिली

सकाळ डिजिटल टीम

बारामती (जि.पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने बारामती येथील रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्ताच्या तब्येतीची रुग्णालयाकडे चौकशी केली. ही घटना माळेगाव काॅलनीमधील रस्त्यावर घडली. माळेगाव येथील दौरा आटोपून अजित पवार हे रविवारी (ता.दहा) बारामतीकडे (Baramati) निघाले असताना माळेगाव काॅलनी येथे अपघात झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवला व अपघातातील जखमीला रुग्णालयात उपचारा करिता नेण्यासाठी ताफ्यातील कारची व्यवस्था केली. (Ajit Pawar Immediately Help Accident Hit Person In Baramati Of Pune)

माळेगाव येथील पोलिस दलाचा कार्यक्रम आटोपून पवार हे बारामतीकडे निघाले होते. त्यांचा ताफा शारदानगर जवळ आला असता माळेगाव काॅलनी येथील बारामती-नीरा रस्त्यावर एका वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवून अपघातातील जखमीला मदत करण्याची सूचना केली.

ताफ्यातील कारमधून जखमीला बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून जखमीवर उपचार करण्याची सूचना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT