Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Interview : मुख्यमंत्रीपदासाठी २०२४ का? आत्ताच...; अजित पवारांचं आणखी एक सूचक विधान

रवींद्र देशमुख

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्याला अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. मात्र आज आणखी एक सूचक विधान करून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना बळ दिलं आहे.

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवार यांनी दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, अस म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकली होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT