ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिला - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

अजित पवार

मुंबई : कोरोनाचे (coronavirus) संकट गेले दिड वर्षे आहे. आम्हांला नायलाजात्सव मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठया संख्येने जात असतात. कोरोनाच्या दुसरी लाटेनंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो. आशिर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खुप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे. तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला

कालच्या निवडणूकीच्या निकालात आम्ही सर्वत्र एकत्र लढलो नसलो तरी आम्हांला चांगलं यश मिळालं. आमची तिघांची मत एकत्र केली तर तो आकडा मोठा होतो आहे. आम्ही स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला होता. जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे.

ही काय मोघलाई लागून गेली आहे का?

काल महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांना ज्याप्रकारे चिरडण्यात आलं त्याचा निषेध करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. परंतु तरीदेखील तसं होताना दिसत नाही. थेट शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतो. ही काय मोघलाई लागून गेली आहे का? आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. त्याकरिता 11 तारखेला आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

तातडीच्या मदतीसाठी निधी जाहीर

टप्प्याटप्प्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. अडीच महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे पुर आला होता आता तिथं केंद्रीय टीम आली आहे. त्यांनी लवकर यायला हवं होतं. अडीच महिन्यांत चित्र बदलून जात. आम्ही तातडीच्या मदतीसाठी निधी जाहीर केली आहे.

नवाब मलिकांना जे योग्य वाटतं ते दाखवण्याचा प्रयत्न

नवाब मलिक यांनी त्यांना जे योग्य वाटतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काय वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्यायला हवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT