Ajit Pawar Gautami Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "बोलवा त्या गौतमी पाटीलला..."; भाषणात पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्कील सल्ला

अजित पवार आणि त्यांची मिश्कील, सडेतोड शैली प्रसिद्ध आहे.

वैष्णवी कारंजकर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या मिश्किल आणि सडेतोड शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच वक्तृत्वशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गौतमी पाटीलला यात्रेला बोलवा असं पवारांनी म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनेलच्या माध्यमातून हा मेळावा भरवण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्याबद्दल उठणाऱ्या वावड्यांवरही भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, "माझ्याबद्दल अनेक बातम्या पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे. जरा कुठं गेलं की पत्रकार म्हणतात, अजित पवार नॉट रिचेबल. माझ्यामागे हे का लागलेत बाबा. एखाद्याच्या किती मागे लागायचं. मी असं का बोलतो, विचारतात. मला येतं ते मी बोलतो. लोकांना वाटतं २०१९ ला केलं तसं करीन का काय. पण मी पुन्हा एकदा सांगतो मी कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे.

अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. यावेळी पवारांनी गौतमी पाटीलचा उल्लेख केला आहे. अजित पवार म्हणाले, "दिवसा मतदान करा, यात्रा - जत्रा काय ते रात्री, काय कापाकापी करायची ती करा. काय तमाशा बघायचा तो रात्री बघा. बोलवा त्या पाटील बाईला...काय नाव.हा गौतमी पाटील. बोलवा." अजित पवारांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लाट उमटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT