supriya sule ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई होणार; सुप्रिया सुळेंनी दिले संकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी बंडखोर आमदारांवर कारवाईचे संकेत दिलं आहेत. रात्री उशिरा सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार यांनी आमदारांवर कारवाईसंबंधी भाष्य केलं नसले तरी सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई होईल, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाईसंदर्भात भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीमधील शपथ घेणाऱ्या आमदार विरोधात अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. या आमदारांविरोधात अपत्रतेची याचिका अध्यक्षांकडे दाखल करण्यात येणार आहे. सुळेंच्या या विधानाने बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असं दिसून येतंय.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, अजितदादा आणि माझ्यात भांडण होणारच नाही. आमचं इमोशनल नातं आहे. विचार वेगळे असतील परंतु नातं कायम आहे.

बंडाबद्दल बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब एखाद्या विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही. पवार साहेब याच्यावर बोलले आहेत. पक्षाची लाईन क्लिअर आहे.

छगन भुजबळ यांनी बोलतांना शरद पवार नरेंद्र मोदींबद्दल बोलल्याचं सांगितलं होतं. त्यावर सुळे म्हणाल्या की, भूजबळ साहेबांना पवार साहेबांनी तसं सांगितलं असेल तर मी ही गोष्ट ऐकलेली नाही. दादा माझा भाऊ आहे म्हणून आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आणि पवार साहेब वडील आहेत म्हणून त्यांच्यासोबतही आयुष्यभर राहणार, नातं कायम राहणार.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, बंड झालं त्याला बारा तासही उलटले नाही. त्यामुळे पुढे काय-काय होतं ते बघू. आज सकाळी दादासोबत मी तीन तास होते. देवगिरीवर दादाची भेट झाली. पण भाऊ-बहिणीत काय चर्चा झाली ते सांगणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT