Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: राष्ट्रवादीचा नवा फंडा! विधानसभेत 'या' नेत्यांना देणार उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम करणाऱ्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून नव्या चेहऱ्यांचा विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी सकाळी नागपुरात माध्यमांसोबत बोलत होते. ते यावेळी म्हणाले, की प्रथम लोकसभा निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही चाचपणी करत आहोत. नवीन चेहऱ्यांचा, महिलांचा विचार केला जात आहे. याबाबत उद्या (ता.५) पुण्यामध्ये बैठक घेणार आहे.

मुंबईमध्येसुद्धा इतर जागांसाठी चर्चा करणार आहे. लोकसभेमध्ये चांगले काम करेल, निकाल चांगला देईल, त्याचा आमदारकीसाठी विचार करू. त्यासाठी इच्छुकांनी अधिक मेहनत घेऊन काम करणे गरजेचे आहे.

जो अधिकाधिक लोकांमध्ये राहून काम करेल, त्याला प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि अशांचाच विचार करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सत्तेच्या फॉम्युल्याबाबत ते म्हणाले, २००४ चा अपवाद वगळता ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असतो, त्या घटनेला आता १९ वर्षे झालेली आहेत.

संजय राऊत यांच्यासोबत वाद नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रवक्ते आहेत. त्यांनी काय बोलावे, त्यांचा विषय आहे. परंतु, आमच्यात कुठलाही वाद नाही. ते मोठे नेते आहेत, असे अजित पवार म्हणाले. ते काही बोलले तर मला वाईट वाटत नाही, तुम्हाला का वाईट वाटते, तुम्ही काळजी करू नका, असे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगतो, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT