chagan bhujbal sharad pawar balasaheb thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : शिवसैनिकांपासून जीव वाचवणाऱ्या शरद पवारांवर छगन भुजबळ कसे उलटले ?

Bhushan Tare भूषण टारे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या अनेक आमदारांसह बंडखोरी करत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला अन् महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी छगन भुजबळ देखील उपस्थित होते भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथ विधीला पक्षाध्यक्ष शरद पवारांचा पाठिंबा नसल्याचेही काल स्पष्ट झाले. त्यामुळे काल शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी राष्ट्रवादी मध्ये बंडच केले असल्याचे सिद्ध झाले आहे.

राष्ट्रवादी मध्ये अजित पवारांनी केलेल्या या बंडात असलेले प्रमुख नाव म्हणजे छगन भुजबळ. राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांमध्ये नाव येणाऱ्या भुजबळ यांनी या पूर्वी शिवसेनेत देखील बंड करून पक्ष फोडला होता.

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडण्याची कामगिरी सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी करून दाखवली होती. ऐंशीच्या दशकात छगन भुजबळ हे सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात विधानसभेत सेनेचे ते एकमेव आमदार होते मात्र तरीही विरोधी बाकांवरून भुजबळांनी शिवसेनेची भूमिका कणखरपणे बजावली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडले.(Chagan Bhujbal shivsena rebel)

तो काळ मंडल आयोगाच्या आंदोलनाचा होता. ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले. असं म्हणतात की एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचे नेते रामराव आदिक यांना बाळासाहेब म्हणाले, 'आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा.' हे वाक्य भुजबळांना उद्देशून असल्याची चर्चा झाली. भुजबळांच्या मनात चलबिचल सुरू झाली.

यातूनच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते असणाऱ्या शरद पवार (sharad pawar )यांच्याशी त्यांचं जवळकीच नातं निर्माण झालं. भुजबळांच्या नाराजीला पवारांनी बळ दिलं. खरा ड्रामा झाला १९९१ सालच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात. ऐन अधिवेशनात छगन भुजबळांनी शिवसेनेच्या १८ आमदारांसह बंड केलं.

शिवसेनेत यापूर्वी बंड हा शब्द देखील उच्चारणे गुन्हा होता. छगन भुजबळांना गद्दार म्हणून घोषित करण्यात आलं. कित्येक शिवसैनिक त्यांच्या जीवावर उठले. शरद पवारांना असे होणार ठाऊक होते. त्यांनी भुजबळांच्या संरक्षणाची आधीच व्यवस्था केली होती. उस्मानाबादचे आमदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी व नातेवाईक होते. त्यांचा दरारा खूप मोठा होता. सुरवातीला नागपूरच्या पॉवर हाऊस मध्ये आणि नंतर पद्मसिंह पाटील यांच्या घरात भुजबळांना लपवण्यात आलं. (Padmasinha patil usmanabad)

पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांची घराबाहेर गस्त होती. भुजबळांना हात देखील लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही.

मात्र दुसऱ्या बाजूला बाकीच्या आमदारांनी मात्र ऐनवेळी कच खाल्ली. बाळासाहेबांच्या क्रोधाला घाबरून १८ पैकी १२ आमदार शिवसेनेत परतले. भुजबळांनी मात्र आपलं बंड मागे घेतलं नाही. ते खुले आम बाळासाहेब ठाकरेंना टी बाळू अशी टीका करत राहिले. शिवसेनाप्रमुखांनी देखील त्यांना लखोबा लोखंडे अशी उपमा दिली होती. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं. पुढे अनेक दिवस भुजबळांना कमांडो प्रोटेक्शन मध्ये राहावं लागलं हे मात्र खरं.

आजही शिवसेनेतून बंड करणाऱ्या आमदारांच्या घरावर हल्ले होतात तेव्हा छगन भुजबळांनी केलेलं बंड आणि शरद पवारांनी त्यांचा वाचवलेला जीव याची आठवण हमखास सांगितली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT