dhananjay munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde Speech : धनंजय मुंडेंनी सांगितली हिंदुत्वाची व्याख्या; शरद पवारांवर केलं भाष्य, म्हणाले...

Upmukhyamantri Ajit Pawar News : अजित पवारांसोबत शपथ घेतलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलतांना सांगितलं की, अनेकजण आम्हांला म्हणतात, हिंदुत्वाबद्दल काय सांगाल. तर मी सांगतो. आमच्याकडे हिंदुत्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्हांला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य आठवतं.

संतोष कानडे

NCP Crisis Live News Updates : मुंबईमध्ये आज शरद पवार गट आणि अजित पवार गटाची सभा होत आहे. कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे जवळपास स्पष्ट होत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार अजित पवारांकडे ३२ तर शरद पवारांकडे १७ जणांचं संख्याबळ असल्याचं दिसून येतंय.

अजित पवारांसोबत शपथ घेतलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलतांना सांगितलं की, अनेकजण आम्हांला म्हणतात, हिंदुत्वाबद्दल काय सांगाल. तर मी सांगतो. आमच्याकडे हिंदुत्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्हांला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्य आठवतं. त्यामुळे आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहोत.

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आमचे दैवत हे साहेब आहेत. माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे आपण सगळ्यांनी साहेबांची सेवा केली आहे. विठ्ठल आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं आहे. आजचा निर्णय घेताना काय जाणीव होतोय, ते मला माहिती आहे. कारण यापूर्वी मी असा अनुभव घेतला आहे.

मुंडे पुढे म्हणाले की, तटकरे साहेबांनी २०१४ नंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने ४० ची संख्या ५४वर पोहोचली. या व्यासपीठावरचा एकही व्यक्ती साहेबांची थुंकी ओलांडू शकत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द पाळला जातो. परंतु सध्या तीन-चार जण म्हणजे पक्ष असल्याचं दिसून येतंय.

अजित पवारांबद्दल बोलतांना मुंडे म्हणाले, प्रसंग कितीही आले परंतु अजितदादांनी शब्द काढला नाही. अनेक मोठ्या संध्या साहेबांच्या शब्दाखातर अजित पवारांनी सहकाऱ्यांना दिल्या. आज माझ्यासारख्या ऊसतोड मजुराच्या मुलाला तुमच्यासमोर बोलण्याची ताकद कुणी दिली असेल तर ती अजितदादांनी. परंतु मागच्या काही दिवसांपासून काहीही झालं तरी टार्गेट दादा असतात. प्रत्येक गोष्टीत दादांना बदनाम केलं गेला. त्यामुळे हा स्वाभिमानाचा मार्ग निवडल्याचं मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT