Ajit Pawar Latest News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : अजित पवारांचं काय होणार? नऊ आमदारांच्या अपात्रतेबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले

रोहित कणसे

अजित पवारांनी काल राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या ९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याला दुजोरा दिला आहे.

या याचिकेवरती काय कारवाई केली जाईल याबद्दल राहुल नार्वेकरांनी माहिती दिली आहे. सांगितलं की, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली आहे, ती मी वाचून घेईल आणि त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्यात येईल.

जयंत पाटील यांची याचिका प्राप्त झाली आहे आणि त्यांचं म्हणणं तपासल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. याचिका वाचल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही असेही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

विरोधीनेते पद कोणाकडे?

जयंत पाटील यांनी काल राष्ट्रवादीते प्रतोद म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आहे. यासोबतच अजित पवारांकडे होतं ते विरोधीपक्ष नेते पद देखील आव्हाडांकडे सोपवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधीपक्ष नेते पद याबद्दल विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहात विरोधपक्ष नेत्याची निवड विधानसभा अध्यक्ष करतात. हा त्यांचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करताना विधानसभा अध्यक्षांना विधानसभेचे नियम आणि घटनेत केलेल्या तरतुदी विचारत घेणे आवश्यक आहे.

जयंत पाटलांनी दाखल केली याचिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची कुठलीही परवानगी न घेता अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ बड्या नेत्यांनी देखील शपथ घेतली दरम्यान यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. ९ आमदार ही पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी केलेली कृती राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांना न सांगता केलेली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT