Ajit Pawar NCP News Sharad Pawar Maharashtra Tour will start from shivneri Dilip Valse Patil constituency  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : राजकीय दंगल होणार! पवारांची पहिली सभा वळसे-पाटलांच्या मतदारसंघातच, त्यानंतर…

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर शरद पवार संपूर्ण राज्यात दौरा करणार आहेत.

शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला शिवनेरीपासून सुरुवात होणार आहे तर दौऱ्याचा शेवट रायगड येथे होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांचा झंझावाती दौरा पाहायला मिळणार आहे. अजित पवारांसोबते शपथ घेतलेल्या आठ आमदारांपैकी एक असलेले दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवारांची पहिली जाहीर सभा होणार आहे. तर दुसरी सभा ही धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात होणार आहे. काही नेत्यांच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार देखील होते. यानंतर शरद पवार यांनी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार नाही तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ अशी भुमिका जाहीर केली होती.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार घराबाहेर पडले होते. आज त्यांनी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी जाहीर सभा देखील घेतली आता त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT