supriya sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule Latest News : सुप्रिया सुळेंची पत्रकारांना हात जोडून विनंती; म्हणाल्या, 'दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम...'

Sharad Pawar Meeting : शरद पवार गटाची बैठक ज्या वाय.बी. सेंटरमध्ये होत आहे तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे येताच पत्रकारांनी त्यांना घेरलं.

संतोष कानडे

Maharashtra Politics News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभूकंप झाल्यानंतर आज कुणाकडे किती आमदार, याचा सोक्षमोक्ष होणार आहे. अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे ४२ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे ११ आमदार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार पुढे येतंय.

प्रत्यक्षात कुणाकडे किती संख्याबळ हे १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, शरद पवार गटाची बैठक ज्या वाय.बी. सेंटरमध्ये होत आहे तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे येताच पत्रकारांनी त्यांना घेरलं.

यावेळी सुप्रिला सुळे यांनी पत्रकारांना बाजूला जावून थांबण्याची हात जोडून विनंती केली. वाय. बी. सेंटरमध्ये दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम असल्याने बाकीच्या भाडेकरुंना त्रास होऊ नये, यासाठी बाजूला थांबा, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, वाय.बी. सेंटरमध्ये आमदार दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाची एक बैठक देवगिरी निवासस्थानी सुरुय. त्या बैठकीनंतर एमईटी कॉलेज येथे त्यांच्या गटाची बैठक होत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे ह्या नाशिकला माघारी परतल्या आहेत. अहिरे ह्या अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होत्या. परंतु नंतर दोन दिवस त्या नॉट रिचेबल होत्या. अहिरे ह्या शरद पवारांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे त्या गोंधळात असल्याचं दिसून येतंय. आज संध्याकाळी अहिरे आपली भूमिका स्पष्ट करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Council Election: महायुतीत गद्दारी! नाशिकमध्ये दराडेंच्या पराभवानंतर शिंदे संतापले, तर विजयी उमेदवाराला बोलावलं मुंबईला

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

चमत्कार! माघार घेऊनही जिंकले, भाजपात 'ओपन वॉर'; नाशिकच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

SCROLL FOR NEXT