Ajit Pawar
Ajit Pawar esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar : वज्रमूठ सभेत पोडियम बदलल्याने अजित पवारांनी घेतला आक्षेप? आदित्य ठाकरेंनी काढली समजूत

संतोष कानडे

मुंबईः महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीमध्ये वज्रमूठ सभा संपन्न झाली. मात्र या सभेमध्ये एक प्रसंग घडल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी बोलणाऱ्या नेत्यांसाठी अचानकपणे पोडियम बदलल्याने अजित पवार संतापले. शेवटी आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना मध्यस्थी करावी लागली.

छत्रपती संभाजी नगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची ठेवल्याने चर्चा झाली होती. आता मुंबईतल्या सभेत पोडियमवरुन कुजबुज सुरु आहे. त्याचं झालं असं की, वज्रमूठ सभेत नाना पटोले यांचं भाषण सुरु असतांना स्टेजच्या मध्यभागी अचानक एक फुलांनी सजवलेला पोडियम आणण्यात आला.

अजित पवारांनी तो पोडियम बघताच त्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तातडीने आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याजवळ जात त्यांची समजूत काढली. त्यानंतर अशोक चव्हाण, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं नवीन फुलांनी सजवलेल्या पोडियमवर झाली.

पोडियमवरुन महाविकास आघाडीत मतभेद झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या पहिल्या वज्रमूठ सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना समान खुर्च्या ठेवण्यात आल्या. आता पोडियमवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे...

  • बाजार समिती निवडणुकीतून जनता आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे

  • मराठी माणूस टिकला तो स्व. बाळासाहेब ठाकरेंमुळे

  • परंतु ते काहींना सहन झालं नाही आणि राजकारण केलं

  • सध्या शेतकरी अवकाळी पावसामुळे पिचला आहे

  • मुख्यमंत्री मात्र राजकारण करण्यात मश्गूल आहेत

  • अजूनही पाच तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे

  • मुंबईत पाऊस नसला तरी राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे

  • निवडणुका का लावल्या जात नाहीत

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत?

  • निवडणुका घेतल्या तर हरण्याची भीती त्यांना आहे

  • दगाफटका करुन आणि गद्दारी करुन आलेलं हे सरकार आहे

  • तरुण-तरुणींच्या हाताला काम नाहीये

  • अलिकडच्या दहा महिन्यांच्या काळात इतक्यांदा मुख्यमंत्री खूपदा चुकले

  • देशाचे पंतप्रधान द्रोपदी मुर्मू असं ते म्हणाले होते

  • बारा-तेरा कोटी जनतेचं नेतृत्व तुम्ही करत आहात

  • मुंबईत साडेतीनशे पन्नास किलोमीटर मेट्रो केली

  • जमत नसेल तर नोट काढा, ती वाचा

  • साडेतीनशे पन्नास कशाला म्हणतात?

  • मागेही एमपीएससी आणि निवडणूक आयोगात गल्लत केली होती

  • अलिकडे कुणी काहीही बातम्या देतं

  • परंतु त्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही

  • 'देखो महाराष्ट्र' अशी जाहिरात महाराष्ट्र विभागाने काढली

  • तुम्हाला मराठीचं वावडं आहे का? बघा महाराष्ट्र, असं म्हणायचं ना

  • आता जनताच तुम्हाला बघणार आहे, हे लक्षात ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : सीएसकेची अवस्था बिकट; डाव सावरणार मिचेल बाद

SCROLL FOR NEXT