Ajit Pawar
Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar : CM शिंदेंमुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? अजित पवार यांची धावाधाव सुरु

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाण्यातील नगरसेवकांची तातडीने बैठक बोलावली आहे. विधान भावनामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 1 ते 2 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर निष्ठावान कोण हे पाहण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्या या आरोपानंतर अजित पवार यांनी या नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी 1 ते 2 कोटींची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत अजित पवार यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. नगरसेवक फुटू नयेत किंवा ऑफरमुळे राष्ट्रवादीत फुट पडू नये यासाठी अजित पवार यांनी धावाधाव सुरु केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ठाण्यातील सर्व नगरसेवक, आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीसोबत सक्षमपणे उभे राहतील. मी आताच त्या बैठकीतून आलो. काही अडचण होईल असं मला वाटत नाही.

त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी मला लवकरच अटक होणार असं सांगितल्यानंतर संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या बैठकीत आव्हाड यांच्याशिवाय निवडणूक लढावी लागेल आणि जिंकावी लागेल. वेळ पडल्यास त्याच्याशिवाय तयारी करावी लागेल असं सांगण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, मला कधीही अटक होऊ शकते; काय आहे कारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत मला आतमध्ये ठेवलं जावू शकतं. केंद्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला तसं सांगितलं असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आव्हाडांनी हा दावा केला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असं ते म्हणाले. हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला खरा मात्र त्यासंबंधीचा कायदा आणण्यासाठी सरकारला कुणीही रोखलेलं नाही. हिंदू मुलींनाच धमक्या देणं योग्य नसल्याचं आव्हाड म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा दावा केला आहे.यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले की, राज्यावर सध्या साडेसहा लाखांपेक्षा जास्तीचं कर्ज आहे. त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही. अशीच आर्थिक परिस्थिती राहिली तर राज्यात दिवाळखोरी येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, टोकाला जायला...", विशाल पाटील अन् कदमांना इशारा, काय आहे प्रकरण?

Kitchen Hacks : सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स वापरून पाहा, वर्षभर राहतील ताजे अन् खराबही होणार नाही

VIP Culture End: आता मंत्र्यांना लाईट बिल स्वतःच्या खिशातून भरावं लागणार; 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय Video Viral

Chandu Champion : "रडून रडून माझी अवस्था वाईट झाली"; चंदू चॅम्पियनचं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केलं भरभरून कौतुक

SCROLL FOR NEXT