Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ...तर शिंदेंसोबत गेलेले परत येतील, आम्हीही त्यांना घेऊ; अजितदादांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे विरोधीपक्षनेते झाले. विरोधीपक्षनेतेपदावर विराजमान झाल्यापासून अजित पवार सत्ताधारी भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यातच आज अजित पवार यांनी साम टिव्हीला दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाचा शिंदे सरकारवर काही परिणाम होणार की नाही, हे सांगता येत नाही. पण त्या दोघांना एकत्र येऊन पराभव पत्करावा लागला आहे. आता त्यांच्यासोबतच्या आमदारांना वाटणारच मताची वजाबाकी भरून काढावी लागेल. काहीही झालं तरी सर्वसामान्य जनता बाळासाहेब ठाकरेंना मानते. त्यांच्याकडे पाहुनच शिवसेनेला मतदान करते.

शिवसेनेच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी आणि रणरागिनींनी ठरवलं तर उद्या उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला आणि सांगतील त्या चिन्हावर मदतान करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी बोलून दाखवला.

दरम्यान जूनमध्ये गेलेलं सरकार पुन्हा आणण्यासाठी काय आखणी केली पाहिजे, मताची विभागणी कशी रोखायची, याचा विचार आणि प्रयत्न करत आहोत. आपण आता त्या गटाकडून निवडून येऊ शकत नाही आणि महाविकास आघाडी पुन्हा येईल, अशी परिस्थिती झाली की, गेलले अनेकजण परत येतील. आम्ही सगळ्यांचा विचार करणार नाहीत. पण इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्यांचा विचार नक्की करू असंही अजित पवार यांनी म्हटलं.

याआधी देशात अनेक नेत्यांचा करिष्मा होता. कधीकाळी इंदिराजींकडे, राजीवजींकडे पाहून, वाजपेयी यांच्याकडे पाहून मतदान झालेलं आपण पाहिलं आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून मतदान झालं, असही पवार यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT