AJit Pawar and Chandrakant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मी पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच; अजित दादांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या घटनांमुळे कोण कोणासोबत सरकार स्थापन करेल याचा काही नेम राहिला नाही. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन बंड केल्यानंतर काहीही होऊ शकतं, असं चित्र तयार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळी ६ वाजता भाजपसोबत जावून घेतलेला शपथविधी सर्वांनाच ठावूक आहे. त्यातच अजित पवार यांनी आज, सूचक विधान केलं आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचे वृत्त येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातच आज अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत विधान करून लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

तुम्ही पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील बैठकीला येत नव्हते. आता ते पालकमंत्री असताना तुम्ही बैठकीला येतात, अस विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, जेव्हा लोक सांगतील की, आता विरोधी पक्षात आमदार म्हणून काम करा, त्यावेळी करायचं. ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचा मंत्री आणि आमदार म्हणून काम करायच असेल तेव्हा आपण पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच आहोत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता सरकार बदललं असून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली असून पुण्याचे कारभारी आता चंद्रकांत पाटील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Rising Stars: तिलक वर्माच्या भारतीय संघाचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपलं! श्रीलंकेकडून दारुण पराभव

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT