Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest News : 'जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत कोणाचा बाप देखील...'; अजित पवार कडाडले

महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, तसाच सर्व धर्मियांसाठी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली राज्य कारभार सुरू असल्याचं ते म्हणाले.

दत्ता लवांडे

Mumbai News : विरोधकांच्या इंडिया बैठकीनंतर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकारनेसुद्धा आपल्या नेत्यांची बैठक घेतली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर वक्तव्य केलं असून मोदीजींचे नेतृत्व फक्त देशानेच नाहीतर जगाने मान्य केलं आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

"महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, त्याचप्रकारे सर्व धर्मियांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार सुरू आहे. मोदीजींच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा विचार आम्ही केला. नवी पहाट आणि नवी सुरूवात या विचाराने आपल्याला पुढे जायचे आहे." असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

"सरकारमध्ये जाऊन आम्हाला फक्त दोन महिने होतील. येत्या काळात सर्वे करू आणि बळीराजाची अडचण कुठे होती हे शोधून त्यांना मदत करू. आम्ही अनेक संकटं पाहिले पण डगमगायचं नसतं. महाराजांच्या विचारांनी पुढे जायचं असतं. आगामी काळात राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन मोदीजींचे हात आम्ही मजबूत करणार आहोत" असंही ते म्हणाले.

"काहीजण चुकीच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवत आहेत. सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय आहे, तिथे सुद्धा आपल्या जागा जास्त आल्या पाहिजेत. मुंबई नंतर सर्व जिल्ह्यात सभा घेतल्या जातील. मोदी यांनी घेतलेल्या 'वन नेशन वन इलेक्शन' या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत." असं अजित पवार म्हणाले.

मागच्या काही दिवसांत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणाचा बाप देखील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. काही लोकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे." असं ते यावेळी म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT