ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

"मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी"

दत्ता लवांडे

गडचिरोली : गडचिरोलीतील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर सरकारने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांना यावेळी लावला आहे.

(Opposition Leader Ajit Pawar On CM Shinde)

गडचिरोली जिल्ह्यात दहा लाख हेक्टर जमीनी पूरामुळे बाधित झाल्या असून सरकारने लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून मदत जाहीर करावी, तातडीने अधिवेशन घेण्याची गरज राज्याला आहे अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊन लोकांना कामाला लावणं चुकीचं आहे. आम्हीपण प्रशासनात काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी जरा बाहेर पडून नकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे, तसेत धरणातून पाण्याचा विसर्ग करताना सतर्कता राखली गेली पाहिजे असं ते म्हणाले.

पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी गेलेल्या नसतानाही भिंती ओल्या झाल्या आहेत, भिंती ओल्या झाल्यावर ते पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा घरांचेही पंचनामे करण्यात यावेत असं पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT