Yashwantrao Chavan Death Anniversary Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'समाजकारण-राजकारण कसं करायचं याची मुहूर्तमेढ यशवंतरावांनी घालून दिलीये'; समाधीस्थळाला अजितदादांनी केलं अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी यशवंतरावांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात.

कऱ्हाड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Yashwantrao Chavan Death Anniversary) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या कऱ्हाडमधील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटीत भजन कार्यक्रमासही हजेरी लावली.

माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, साहित्य आजही मार्गदर्शक आहेत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT