Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: '...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय', अमित शाहांच्या कार्यक्रमात अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आजच्या कार्यक्रमात अजित पवारांकडून मोदी-शहांचं तोंडभरुन कौतुक

अंकिता खाणे (Ankita Khane)

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंग सोहळ्याला सुरूवात झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत, केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्राचे सहकार दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना अजित पवारांनी मोदी आणि शाहांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. बोलताना अजित पवार म्हणाले की, 'शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

'अमित शाह हे गुजरातचे आहेत, पण त्याचं महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं. हे अमित शाहांच्या रूपाने पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झालेली आहे', असंही अजित पवार म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही हे डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित शाहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे', असंही ते म्हणालेत.

तर आज कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT